कैद्यांचे जेवण होणार चवदार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

मुंबई - तुरुंगातील कैद्यांना कोणत्या प्रकारचे जेवण द्यायला हवे, यासाठी प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांची मदत घेण्यात येणार आहे. काही दिवसांतच ऑर्थर रोड तुरुंगात प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबवला जाणार आहे, अशी माहिती गृह विभागातील सूत्रांनी दिली.

कैद्यांना जेवणासाठी दिल्या जाणाऱ्या ताट आणि वाट्यांमध्येही बदल केला जाणार आहे. स्टीलऐवजी आता प्लॅस्टिकची आकर्षक ताटे दिली जाणार आहेत. तुरुंगात कैद्यांच्या जेवणातील चपात्या बनवण्यासाठी अत्याधुनिक यंत्र खरेदी केले जाणार आहे.

कॅंटीनमध्ये तयार होणारे जेवण कैद्यापर्यंत पोचेपर्यंत थंड होते, अशा तक्रारी होत असल्याने जेवण गरम राहावे, यासाठी हॉटपॉटचा वापर केला जाणार आहे. यापुढे बुफे पद्धतीने कैद्यांना जेवण दिले जाणार आहे. तुरुंगातील नियमांनुसारच कैद्यांना जेवण दिले जाते. डाळ, भात, चपाती, भाजी असा साधा मेनू जरी असला, तरी शेफ संजीव कपूर यांच्या मार्गदर्शनामुळे त्याच्या चवीत फरक पडेल, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे.

Web Title: sanjiv kapoor to teach prisoners cooking