भरमसाट फी आकारणाऱ्या शाळांची चौकशी होणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 एप्रिल 2017

मुंबई - भरमसाट फी आकारून शाळा लूट करीत आहेत. त्याबाबत पालकांनी थेट शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. यातील दोन शाळा कांदिवली येथील ठाकूर आणि लोखंडवाला संकुल; तर एक शाळा दहिसर येथील आहे. याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पालकांना चौकशीचे आश्‍वासन दिले आहे. 

"केजी'तून पहिलीत दाखल करताना प्रवेश फी आकारली जाते. याबाबत "फोरम फॉर फॅअरनेस इन एज्युकेशन' या संस्थेकडे पालकांनी तक्रार केली होती. कांदिवलीतील लोखंडवाला संकुलातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा प्रकार सुरू असल्याची पालिकांची तक्रार आहे. आणखी दोन शाळाही भरमसाट फी आकारत असल्याची प्रकरणे उघड झाली आहेत. याप्रकरणी पालकांनी "फोरम फॉर फॅअरनेस इन एज्युकेशन'चे प्रमुख जयंत जैन यांच्यासह शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. 

पुनर्प्रवेश आणि संरक्षण फी मिळून 55 हजार रुपये शाळा आकारत असल्याची तक्रार पालकांनी केली. विभागीय शिक्षणाधिकाऱ्यांना सोमवारी या शाळांना भेटी देण्याच्या सूचना शिक्षणमंत्र्यांनी केल्या. गरज भासल्यास शाळा प्रशासन आणि पालकांसह बैठकही विभागीय शिक्षणाधिकारी घेतील. वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. 

Web Title: school fee issue