मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील शाळांना बुधवारी सुटी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून, लाखो नागरिक मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे.

मुंबई : मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर उद्या (बुधवार) दक्षिण मुंबईतील सर्व शाळांना सुटी देण्यात आली आहे.

शिक्षण विभागाने आज एक प्रसिद्धीपत्रक काढून दक्षिण मुंबईतील सर्व शाळांना उद्या सुटी जाहीर करण्यात आली आहे. सायन ते कुलाबा शाळा बंद राहणार आहेत. मुंबईमध्ये बुधवारी मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. मोर्चामुळे शालेय वाहतुकीस यामुळे अडचण निर्माण झाल्यास विद्यार्थी वाहतूक कोंडीमध्ये अडकण्याची शक्यता आहे, असे सांगत शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. सरकारी शाळांसह खासगी शाळांनाही सुटी देण्यात आली आहे.  

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून, लाखो नागरिक मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :