आठवलेंच्या पत्नी राजकारणात?

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 24 डिसेंबर 2016

मुंबई - केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा या पक्षाच्या राजकारणात सक्रिय झाल्याचे समजते. पक्षात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी "मॅडम' जातीने लक्ष घालत असल्याचे पक्षातील काही कार्यकर्त्यांनी सांगितले.

मुंबई - केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा या पक्षाच्या राजकारणात सक्रिय झाल्याचे समजते. पक्षात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी "मॅडम' जातीने लक्ष घालत असल्याचे पक्षातील काही कार्यकर्त्यांनी सांगितले.

सीमा रामदास आठवले यांच्याकडे पक्षाचे कोणतेही अधिकृत पद नाही. पक्षाच्या कार्यक्रमात त्या सहभागी होत नसत; पण रामदास आठवलेंच्या गळ्यात खासदारकीची माळ पडल्यापासून पक्षाचे मेळावे आणि आंदोलनात सीमा सहभागी होत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक महिलांचे अर्जही सीमा यांनी स्वीकारले. प्राथमिक मुलाखत प्रक्रियेत त्या सहभागी झाल्या होत्या. महिला आघाडी सध्या करत असलेल्या कामामागे त्यांचे मार्गदर्शन असते.

पक्षाला एखादे महामंडळ मिळावे यासाठी आठवले प्रयत्नशील आहेत. त्याच वेळी सीमा यांचे सक्रिय होणे दुसऱ्या फळीतील काही नेत्यांना खटकत असल्याचे जाणवते. सीमा या उच्च विद्याविभूषित आहेत. त्यामुळे या पक्षाला महामंडळ देण्याचा निर्णय झाला तर त्याचे अध्यक्षपद त्यांच्याकडे जाईल आणि इतकी वर्षे पक्षाचे निष्ठेने काम करूनही आपल्याला निराश व्हावे लागेल, अशी चिंता काही नेत्यांना असल्याचे समजते.

पदाधिकारी महिलांच्या आग्रहाखातर उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी कार्यालयात गेले होते. संघटनेत महिलांची संख्या वाढावी, यासाठी आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू केले आहेत; पण मला राजकीय महत्त्वाकांक्षा नाही.
- सीमा रामदास आठवले

राजकीय वारसदार कोण असावे याचा विचार केला नाही. महिला आघाडीत ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी "मॅडम' प्रयत्न करत आहेत.
- रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री.

मुंबई

विरार - मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपने मॅजिक फिगर पार करून 61 जागांवर विजयी पताका फडकवली असली, तरी त्यांच्या यशात सिंहाचा...

05.24 AM

मुंबई  - आरे कॉलनीत मेट्रोची कारशेड उभारण्याकरिता 30 हेक्‍टर जागा घेण्याचा आटापिटा सरकार करत आहे; परंतु या व्यवहारात 18...

05.12 AM

मुंबई - कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे रखडलेले निकाल कधी जाहीर करणार, याची माहिती दोन दिवसांत देण्याचे आदेश मुंबई उच्च...

04.30 AM