शिवसेना- भाजपमध्ये घराणेशाहीचे वर्चस्व

शिवसेना- भाजपमध्ये घराणेशाहीचे वर्चस्व

मुंबई - सत्तेचे गणित जुळवताना शिवसेना, भाजपमध्ये घराणेशाहीला ऊत आला आहे. आमदार, खासदारांनी त्यांच्या मुलांना, पत्नीला निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी पत्नीसह वहिनीलाही उमेदवारी मिळवून दिली आहे; तर पती-पत्नी आणि बाप-लेक असेही निवडणुकीतच्या मैदानात उतरले आहेत. मोठा भाऊ राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आमदार, लहान भाऊ आणि तिसऱ्या भावाच्या वहिनीला भाजपने उमेदवारी दिली. नेत्यांच्या घरात सत्ता पिंगा घालत असताना कार्यकर्ते रस्त्यावर तळपत्या उन्हात पक्षश्रेष्ठींच्या बंगल्याबाहेर नाही, तर कार्यालयाबाहेर अपेक्षेने बसले होते; मात्र आम्ही फक्त झेंडे मिरवायचे अशी स्वतःची समजूत घालत, पक्षादेश मानत आल्या पावली परत गेले; तर काहींनी धाडस दाखवत पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकावला आहे.

अशी घराणेशाही
-खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांना अणुशक्ती नगर प्रभाग क्रमांक 144 मधून उमेदवारी मिळाली. त्याचबरोबर त्यांच्या वहिनी वैशाली शेवाळे यांना मानखुर्द येथील प्रभाग क्रमांक 142 येथून उमेदवारी देण्यात आली.
- भाजपचे खासदार डॉ. किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या मुलुंड पूर्वेकडील 108 प्रभागातून निवडणूक लढवत आहे.
-शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले बबलू पांचाळ यांना मानखुर्द येथील 141 प्रभागातून उमेदवारी मिळाली; तर त्यांच्या पत्नीला अणुशक्ती नगरमधील 144 क्रमांकाच्या प्रभागातून उमेदवारी मिळाली.
-मनसेमध्ये विद्यमान नगरसेवक दिलीप लांडे कुर्ला येथील 163 क्रमांकाच्या प्रभागातून निवडणूक लढवणार आहेत; तर त्यांच्या बाजूच्याच प्रभागात 162 मध्ये त्यांचा मुलगा प्रणव लांडे हा निवडणूक लढवत आहे.
-वर्सोवा येथील भाजपच्या आमदार भारती लव्हेकर यांचा भाचा योगराज दाभाळकर यांना उमेदवारी दिली; तर अंधेरीतच भाजपचे आमदार अमित साटम यांनी त्यांचे मेहुणे रोहन राठोड यांच्यासाठी 68 क्रमांकाच्या प्रभागातून उमेदवारी मिळवली.
-शीव कोळीवाडा येथील भाजपचे आमदार तमिल सेल्वन यांनी त्यांचा भाऊ मुरगन याला 176 प्रभागातून उमेदवारी मिळवून दिली.
-कुलाबा येथे राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे सदस्य असलेले ऍड. राहुल नार्वेकर यांचा भाऊ नगरसेवक ऍड. मकरंद नार्वेकर यांच्यासह त्याच्या लहान भावाची पत्नी हर्षिदा नार्वेकर यांनाही उमेदवारी मिळाली आहे.
-कुलाबा येथील भाजपचे आमदार राज पुरोहित यांचा पुत्र आकाश पुरोहितही निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com