पुलांवरही सेन्सर

मंगेश सौंदाळकर
शुक्रवार, 25 मे 2018

मुंबई - पावसाळ्यात नद्यांच्या पाण्याची पातळी वाढून होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यातील २९३ पुलांवर सेन्सर बसवले आहेत. पाण्याची पातळी वाढल्यास या सेन्सरद्वारे जिल्हाधिकारी, ग्रामसेवक, सरपंचांना मेसेज आणि ई-मेलच्या माध्यमातून अलर्ट केले जाणार आहे.

काही जिल्ह्यांतील पूल मोठ्या नद्यांवर बांधले आहेत. तेथे दर वर्षी पावसाळ्यात पुराचा धोका उद्‌भवतो. या पार्श्‍वभूमीवर पुलांवर सेन्सर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत राज्यातील २९३ पुलांवर सेन्सर बसवले आहेत, ज्या नद्यांवर शंभर मीटर उंचीचे पूल आहेत, तेथे हे सेन्सर बसवण्यात आले आहेत.

असा मिळणार अलर्ट
    मोठ्या नद्या किंवा छोट्या नाल्यांवरील ज्या पुलांवरून वाहतूक होते, तेथे सोलर पॅनल आणि बॅटरी बॅकअप असलेली यंत्रणा बसवण्यात आली आहे.
    सेन्सरचा एक भाग पुलाखाली बसवण्यात आला आहे.
    पाण्याची पातळी वाढण्यास सुरवात झाल्यास त्यासंदर्भातील मेसेज किंवा ई-मेल संबंधित अभियंते, जिल्हाधिकाऱ्यांसह तलाठी, ग्रामसेवक आणि सरपंचांना मिळेल.
    ठरावीक पातळीवर पाणी आल्यास तेथील वाहतूक बंद केली जाईल.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या मोठ्या पुलांवर पुराच्या पाण्यापासून संभाव्य धोक्‍याची सूचना देणारे सेन्सर लावले आहेत. पावसाळ्यात नद्यांनी धोक्‍याची पातळी ओलांडल्यास सेन्सरमार्फत आपत्कालीन कक्षातील अधिकाऱ्यांना संदेश जाऊन संभाव्य धोका टाळता येईल.
- चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री

Web Title: sensor on bridge