शाहरूख खानचा बंगला पुन्हा वादात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

मुंबई - अभिनेता शाहरूख खान याचा "मन्नत' बंगला पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्‍यता आहे. या बंगल्याच्या जागेच्या भाडेकरारातील अटी-शर्तींचे उल्लंघन केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्यामुळे शाहरूखला कोट्यवधींचा दंड होण्याची शक्‍यता आहे.

बंगल्याची जागा सरकारची असून ती भाडेकराराने दिलेली आहे. करारातील अटी-शर्तींचे उल्लंघन झाले असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे शाहरूखकडून कोट्यवधींचा दंड घेतला जाण्याची शक्‍यता आहे. अंधेरीतील तहसीलदार कार्यालय आणि पालिकेच्या एच वॉर्डचा अहवालही मागवण्यात आला आहे. दोन्ही अहवालांची तपासणी झाल्यावर पुढची कारवाई निश्‍चित होणार असल्याचे समजते. यापूर्वीही शाहरूखच्या बंगल्याबाहेर केलेले बेकायदा बांधकाम तोडण्यासाठी आलेला खर्च मुंबई महापालिकेने वसूल केला होता. शाहरूखकडून एक लाख 93 हजार 784 रुपयांचा दंड पालिकेने घेतला होता. शाहरूखने बंगल्याजवळ "व्हॅनिटी व्हॅन' उभी करण्यासाठी रॅम्प बांधला होता; ते रस्त्यावर केलेले अतिक्रमण होते.