महिला स्वच्छतागृहांच्या प्रश्नावर एकत्रितपणे कामाची गरज- ठाकरे

कृष्णा जोशी
बुधवार, 17 मे 2017

मुंबई: महिलांच्या स्वच्छतागृहांच्या प्रश्नावर सर्वांनीच एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी या प्रश्नावर तनिष्का व्यासपीठाबरोबर काम करण्याची तयारी दाखवली आहे.

सकाळ, तनिष्का व यिन यांनी नुकतीच शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची पहाणी केली होती, त्यात अनेक तृटी दिसून आल्या होत्या. ठाकरे यांची कलकी ही स्वयंसेवी संस्था महिलांच्या अनेक प्रश्नांबाबत काम करते. स्वच्छतागृहांच्या विषयावर सकाळ, तनिष्का व यिन ने केलेल्या सर्वेक्षणाचे त्यांनी स्वागत केले. या अशा बाबींवर कोणीही लक्ष देत नाही, खरे पाहता प्रसारमाध्यमांनीच अशा बाबींवर देखरेख ठेवली पाहिजे. सर्वांनीच एकत्रितपणे हे काम करण्याची गरज आहे, या कामात आपणही सकाळ व तनिष्का, यिन यांच्या बरोबर आहोत, असेही श्रीमती ठाकरे म्हणाल्या.