निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

नवी मुंबई - राज्यात व परराज्यांत निवडणुकांदरम्यान सुरू असलेल्या गोंधळाचा दाखला देत निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले आहे का, अशी शंका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केली. निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत आम्ही पुरावे गोळा केले आहेत. वेळ पडल्यास न्यायालयीन लढाईचा विचार करावा लागेल, असा इशारा पवार यांनी यावेळी दिला. 

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी वाशीत आयोजित प्रचार सभेत बोलताना पवार यांनी सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडले. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचाराचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पवार यांनी भाजपच्या कारभारावर सडकून टीका केली. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शेकाप, आरपीआय, समाजवादी पक्ष यांच्या महाआघाडीने कोकणात शिक्षक मतदारसंघ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जिंकली, आता कोकण पदवीधरची निवडणूक निश्‍चितच जिंकू, असा विश्‍वास पवार यांनी व्यक्त केला. 

जनतेकडून सत्ताबदलाचे संकेत 
देशात अलीकडेच पार पडलेल्या 10 पोटनिवडणुकांमध्ये 8 ठिकाणी भाजपचा पराभव झाला आहे. देशातील जनता सत्तेच्या बदलाचे संकेत देत आहे. कर्नाटक विधानसभेच्या अलीकडेच झालेल्या निवडणुकांपासून याची सुरुवात झाली आहे. पुरोगामी विचारांच्या शक्तींनी एकत्र येऊन देशात परिवर्तनाची प्रक्रिया गतिमान करण्याची गरज आहे. सत्तेच्या माध्यमातून साम, दाम, भेद, दंडाचा वापर करून केवळ निवडणुका जिंकायच्या, हा एककलमी कार्यक्रम सत्ताधारी राबवित असल्याचा घणाघात त्यांनी यावेळी केला. 

नरेंद्र पाटील यांना भाषणाची संधी 
राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजपच्या वाटेवर असलेले आमदार नरेंद्र पाटील यांना मंचावर भाषण करण्यासाठी संधी देण्यात आली. त्यावेळी भाषणात बोलताना पाटील यांनी आपण यापुढेही काम करत राहणार असल्याचा पुनरुच्चार केला. मात्र अचानक पाटील यांना भाषण करण्यासाठी मुद्दाम संधी दिल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती. 

Web Title: Sharad Pawar criticism on Election Commission Officer