सीबीआयच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

मुंबई - शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी शामवर रायचा जबाब नोंदवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची साक्ष घेण्यास परवानगी देण्याच्या सीबीआय न्यायालयाच्या आदेशाला पीटर मुखर्जीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. 

मुंबई - शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी शामवर रायचा जबाब नोंदवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची साक्ष घेण्यास परवानगी देण्याच्या सीबीआय न्यायालयाच्या आदेशाला पीटर मुखर्जीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. 

अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी ऑगस्ट 2015 मध्ये शामवर रायला अटक केली होती. या प्रकरणात त्याचा जबाब गौतम दळवी या पोलिस अधिकाऱ्याने नोंदवला होता. इंद्राणी मुखर्जी आणि संजीव खन्ना या दोघांनी शीनाची 2012 मध्ये हत्या केल्याचे त्याने या जबाबात म्हटले होते. या पोलिस अधिकाऱ्याची साक्ष घेण्याची परवानगी सीबीआयने न्यायालयाकडे मागितली होती. त्यानुसार दळवी यांचा जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असताना, शामवरने काय जबाब दिला, अशी विचारणा सरकारी वकिलांनी केली. त्याला पीटर आणि इंद्राणीच्या वकिलांनी आक्षेप घेतला. दुसऱ्या एका प्रकरणात पोलिसाने घेतलेला जबाब या हत्या प्रकरणात नोंदवता येत नसल्याचे कारण देत हा आक्षेप घेण्यात आला होता. मात्र, त्यांची मागणी न्यायालयाने फेटाळल्याने या निकालाविरोधात उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. या मुद्द्यावर उच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित असल्याने, तोपर्यंत या प्रकरणाची सुनावणी तहकूब करण्याची मागणी सत्र न्यायालयाने मान्य केली. 

Web Title: Sheena Bora murder case