इंद्राणीच्या आजारपणाची चौकशी करणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

मुंबई - शीना बोरा हत्येप्रकरणी कैदेत असलेल्या इंद्राणी मुखर्जीची प्रकृती खालावल्याने तिला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तुरुंग प्रशासनाने तिच्या आजारपणाची गंभीर दखल घेतली आहे. महानिरीक्षक (तुरुंग प्रशासन) राजवर्धन हे आता सविस्तर चौकशी करून त्याचा अहवाल तुरुंग विभागाकडे पाठवणार आहेत. इंद्राणी मुखर्जी ही सध्या भायखळा तुरुंगात आहे. तुरुंगातील डॉक्‍टरांच्या सल्ल्याने तिच्यावर औषधोपचार सुरू आहेत.

Web Title: Sheena Bora murder case Indrani illness will be investigated