शिवसेनेचे राजकारण भाजपला अडचणीचे 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 15 मार्च 2017

मुंबई - सत्तेत राहून विरोधकांची भूमिका बजावणारी शिवसेना शेतकरी कर्जमाफीवरून अधिक आक्रमक झाली आहे. ही आक्रमकता भाजप-शिवसेनेमधील दरी रुंदावण्यास कारणीभूत ठरणार आहे. 

मुंबई - सत्तेत राहून विरोधकांची भूमिका बजावणारी शिवसेना शेतकरी कर्जमाफीवरून अधिक आक्रमक झाली आहे. ही आक्रमकता भाजप-शिवसेनेमधील दरी रुंदावण्यास कारणीभूत ठरणार आहे. 

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपने कर्जमाफीचे आश्‍वासन दिले आहे. त्याच धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी विरोधकांसह सत्ताधारी शिवसेनेचीही मागणी आहे. ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत शिवसेना सत्तेत राहून भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करणार आहे. यामुळे शिवसेना-भाजपमधील ताण वाढणार आहे. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीबरोबरच शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपबरोबर निवडणुकीनंतरच्या राजकीय समिकरणांसाठी हात पुढे केला नाही. तर स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना अधिकार देऊन गरज असेल तिथे कॉंग्रेस अथवा राष्ट्रवादी कॉंग्रेसला मदत केली अथवा मदत घेतल्याचे सांगितले जात आहे. एकूणच शिवसेनेकडून भाजपला अडचणीचे ठरणारे राजकारण केले जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

Web Title: shiv sena bjp politics