मंत्रिमंडळ निर्णयावर शिवसेनेची कुरघोडी 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना- भाजपची युती होण्यासाठी दोन्ही पक्षांकडून खलबते सुरू असतानाच जाहीरनाम्याचा भाग म्हणून शिवसेनेने भाजपवर आज कुरघोडी केली. 500 चौरस फुटांपर्यंत सदनिका असलेल्या मुंबईकरांसाठी पाच वर्षे मालमत्ताकरात वाढ न करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालमत्ताकरच माफ करण्याचे आश्‍वासन आज दिले. ठाकरे यांच्या या विधानावर भाजपने सारवासारव केली असून, हा निर्णय आमचाच असल्याचे जाहीर केले. 

उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद आयोजित करून निवडणुकीत द्यावयाची काही आश्वासने जाहीर केली. मुंबईतील 500 चौरस फुटांच्या घरांना सरसकट करमाफी, तर 700 चौरस फुटांपर्यंत घरे असणाऱ्या रहिवाशांना मालमत्ताकरात सवलत देण्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिले. वास्तविक पाहता या संदर्भातील निर्णय राज्य सरकारने 27 मे 2015 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता. मुंबई महापालिका क्षेत्रातील 500 चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांच्या मालमत्ताकरात पुढील पाच वर्षे वाढ न करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या या निर्णयाची भाजपला आठवण होण्याआधीच उद्धव ठाकरे यांनी भाजपवर कुरघोडी केली. अशा रहिवाशांना मालमत्ताकरात सूट देण्यापेक्षा सरसकट करच माफ करण्याची त्यांनी घोषणा केली. त्यापुढे जाऊन 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करसवलत जाहीर करून मुंबईतील हा मतदार कॅश करण्यासाठी ठाकरे यांनी पुढचे पाऊल टाकले. 

या विषयावर प्रतिक्रिया देताना मुंबई भाजपचे अध्यक्ष ऍड. आशिष शेलार यांनी करमाफी देण्याची आपण विधिमंडळात मागणी केल्याची आठवण ठाकरे यांना करून दिली. तसेच, भाजपच्या जाहीरनाम्यात या मुद्द्याचा समावेश होणार असल्याचे सुतोवाचही त्यांनी केले.

Web Title: Shiv Sena on the Cabinet decision