शिवसेना नगरसेवकाला पाच दिवसांची कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

कल्याण - शिवसेना नगरसेविका माधुरी काळे यांच्या पतीवर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मार्च महिन्यात प्रशांत काळे यांच्यावर त्यांच्या घराबाहेर हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी काळे कुटुंबीयांनी शिवसेना पदाधिकारी संजय गायकवाड यांच्यावर संशय व्यक्त केला होता; मात्र पोलिस तपासात महेश गायकवाड यांचे नाव पुढे आले. मागील आठवड्यात कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली होती. त्यातील एक आरोपी महेश गायकवाड यांचा निकटवर्ती मानला जात असल्याने त्यावेळीच गायकवाड यांच्या अटकेची शक्‍यता वर्तवण्यात येत होती.

कल्याण - शिवसेना नगरसेविका माधुरी काळे यांच्या पतीवर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मार्च महिन्यात प्रशांत काळे यांच्यावर त्यांच्या घराबाहेर हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी काळे कुटुंबीयांनी शिवसेना पदाधिकारी संजय गायकवाड यांच्यावर संशय व्यक्त केला होता; मात्र पोलिस तपासात महेश गायकवाड यांचे नाव पुढे आले. मागील आठवड्यात कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली होती. त्यातील एक आरोपी महेश गायकवाड यांचा निकटवर्ती मानला जात असल्याने त्यावेळीच गायकवाड यांच्या अटकेची शक्‍यता वर्तवण्यात येत होती. गायकवाड यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गायकवाड यांच्यावर 307 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत काळे आणि महेश गायकवाड यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते; मात्र राजकीय इर्षेतून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. 

Web Title: Shiv Sena corporator for five days in custody