शिवरायांचे स्मारक ठरेल भारताची ओळख : फडणवीस

Shivaji memorial will be introduced in India: accountant
Shivaji memorial will be introduced in India: accountant

मुंबई :'आजच्याच दिवशी 352 दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग किल्ल्याचे भूमिपूजन शिवाजी महाराजांनी केले होते. आज त्यांचे सेवक म्हणून शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले जात आहे. हे जगातील सर्वांत उंच स्मारक असेल. 'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी'ने अमेरिका ओळखली जात असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भव्य स्मारकामुळे भारत ओळखला जाईल,' असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे आज भूमिपूजन झाले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचे भाषण झाले. यावेळी राज्यपाल विद्यासागर राव, वेंकय्या नायडू, नितीन गडकरी, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, उदयनराजे भोसले, संभाजीराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, "गेल्या 15 वर्षांपासून शिवभक्त या स्मारकाची वाट पाहत होते. आघाडी सरकार फक्त घोषणाच करत होते. पण प्रकाश जावडेकर यांनी सहा महिन्यांतच सर्व आवश्‍यक परवानगी दिल्या. त्यामुळे या स्मारकाचा मार्ग मोकळा झाला. हे स्मारक निश्‍चित वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. हे स्मारक पूर्ण झाल्यानंतर जगभरातील लोकांसाठी ते एक आकर्षण ठरेल, असा विश्‍वास आहे.''

यावेळी ट्रान्स-हार्बर लिंक आणि मेट्रोच्या पुढील टप्प्याच्या कामाचाही आरंभ करण्यात आला. 'ट्रान्स-हार्बर लिंकच्या सेतूमुळे सर्वसामान्य मुंबईकरांचे आयुष्य सुखकर होणार आहे. एमएमआरडीएमध्ये 200 किलोमीटर मेट्रोचे जाळे उभारले जाणार आहे. येत्या पाच वर्षांत मुंबईच्या सर्व कानाकोपऱ्यांत मेट्रोचे जाळे पसरले असेल, असा विश्‍वास आहे. पाच वर्षांत हे मेट्रोचे जाळे पूर्ण झाल्यानंतर त्याची प्रवासी वाहन क्षमता 90 लाख इतकी असेल. कुठल्याही मुंबईकराला स्वत:चे वाहन वापरण्याची वेळच येऊ नये, असा आमचा प्रयत्न असेल. आम्ही सामान्य माणसासाठी मुंबई घडवत आहोत,' असे फडणवीस म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com