मुंबईत शिवसेना मोठा पक्ष

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

मुंबई - ऍक्‍सिस इंडिया टुडेच्या एक्‍झिट पोलमध्ये शिवसेना आणि भाजपला साधारण सारख्याच जागा (80 ते 90) मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यातही शिवसेनेला झुकते माप देण्यात आले आहे. तर पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का बसण्याची शक्‍यता वर्तवली आहे. ठाणे व नागपूरमध्ये अनुक्रमे शिवसेना व भाजपचे वर्चस्व राहिल, असा या एक्‍झिट पोलचा अंदाज आहे.

राज्यातील 10 महापालिका निवडणुकांच्या निकालाची उत्सुकता आहे. मतदानानंतर ऍक्‍सिस-इंडिया टुडेने एक्‍झिट पोल जाहीर केले आहेत. त्यानुसार मुंबई महापालिकेत शिवसेनेला 86 ते 92 जागा; तर भाजपला 80 ते 88 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत शिवसेना मोठा पक्ष ठरण्याची; तर पुण्यात राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्‍यता या एक्‍झिट पोलने वर्तवली आहे.

मुंबईत कॉंग्रेस 30 ते 34 आणि मनसे पाच ते सात जागांवर विजयी होईल, असा अंदाज या पोलमध्ये आहे. त्याचप्रमाणे पुणे महापालिकेत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्‍यताही पोलने वर्तवली आहे. पुण्यात भाजप 77 ते 85, कॉंग्रेस-राष्ट्रवादी 60 ते 66, शिवसेना 10 ते 13, मनसे तीन ते सहा व एक ते तीन इतर उमेदवार विजयी होतील, असा अंदाजही या पोलने वर्तवला आहे.

ठाण्यात शिवसेनेला 62 ते 70, तर भाजपला 26 ते 33, राष्ट्रवादीला 29 ते 34 व कॉंग्रेसला दोन ते सहा जागा मिळतील, असेही हा एक्‍झिट पोल म्हणतो. तसेच नागपूर महापालिकेत भाजपला 98 ते 110 जागा मिळतील अंदाज आहे; तर कॉंग्रेस 35 ते 41 व शिवसेना दोन ते चार जागांवर विजयी होईल, असा या पोलचा अंदाज आहे.

Web Title: shivsena big party in mumbai