आणि शिवसेनेने हातात घेतला झाडू...

ulhasnagar
ulhasnagar

उल्हासनगर : तीन दिवसांपूर्वी गळती लागलेल्या उल्हासनगरातील शासकीय रुग्णालयावर खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी धडक दिली असता, संपूर्ण रुग्णालयच घाणीच्या साम्राज्यात असल्याची बाब निदर्शनास आल्यावर, आज शिवसेनेने हातात झाडू, जंतुनाशक फवारणीची पंप घेऊन रुग्णालयाला चकाचक करून सोडले.

आवारात असलेले खड्डे देखील भरून काढले. शिवसैनिकांनी अचानकपणे राबवलेल्या या उपक्रमाला रुग्णांणी मनःपूर्वक दाद दिली. शौचालय घाण, भिंतीवर पान-तंबाखूच्या पिचकाऱ्या, काळवंटलेल्या लाद्या अशी विदारक परिस्थिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी धडक देताना शिवसेनेच्या निदर्शनास आली होती. जिल्हा रुग्णालयाचा दर्जा असलेल्या या रुग्णालयात अशी दुरावस्था असल्याने शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, माजी शहरप्रमुख रमेश मुकने, उपशहरप्रमुख राजेंद्र शाहु, ग्राहक संरक्षण कक्ष प्रमुख जयकुमार केणी, माजी नगरसेवक अंकुश म्हस्के, उत्तर भारतीय शहर अधिकारी के.डी.तिवारी, युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे, नगरसेविका शुभांगी बेहेनवाल, अपंग सहाय्य सेनेचे भरत खरे, विभागप्रमुख सुरेश सोनवणे, शाखाप्रमुख विनोद हिंगे, सुरेश पाटील, आदेश पाटील, विनोद सालेकर, अनिल मराठे, सागर उटवाल आदींनी या उपक्रमात भाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com