सहा महिन्यापूर्वीची भाजपची भाषा बदलली : शिवसेना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

शिवसेना आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार आहे. भाजपची असलेली सहा महिन्यापूर्वीची भाषा वेगळी होती आणि आताची भाषा वेगळी झाली आहे.

- सुभाष देसाई, उद्योगमंत्री

मुंबई : भाजपला आता एनडीएमध्ये घटक पक्ष असलेल्या मित्र पक्षांची गरज पडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जनतेचे नेते आहेत. शिवसेना आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार आहे. भाजपची असलेली सहा महिन्यापूर्वीची भाषा वेगळी होती आणि आताची भाषा वेगळी झाली आहे, अशी टीका राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सांगितले.

सुभाष देसाई यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, "2019 मध्ये एनडीएचे सरकार येणार असे सांगण्यात येत आहे. भाजप स्वतंत्रपणे निवडून येण्याची शक्यता नाही. त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एनडीएचे सरकार येणार म्हणून बोलत आहेत. स्वतंत्र निवडणूक लढवणे हाच सध्या पर्याय उरला आहे. यापूर्वी दोन वेळा उद्धव ठाकरेंनी ठराव करून स्वबळावर निवडणूक लढवणार म्हणून सांगितले होते. मात्र, भाजपची सहा महिन्यापूर्वीची भाषा वेगळी होती आणि आताची भाषा वेगळी झाली आहे.

Web Title: Shivsena Criticizes BJP the language of BJP have been changed says Shivsena Leader Subhash Desai