शिवसेनेचा अपंग निराधार महिलेला आर्थिक मदतीचा हात

ulhasnagar
ulhasnagar

उल्हासनगर : तेरा वर्षांपूर्वी प्रसूतीवेळी दोन्ही पायांनी अधू झाल्यावर आणि पती घराबाहेर निघून गेल्यावर निराधार अवस्थेत दोन मुलांसोबत उपासमारीचे जीवन जगणाऱ्या उल्हासनगरातील एका निराधार महिलेला शिवसेनेने आर्थिक मदतीचा हात देतानाच तिच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे.हे आपुलकीचे वातावरण बघून या महिलेचा अश्रूंचा बांध फुटल्यावर उपस्थित सर्वांचेच डोळे पाणाऊन गेले. 

साधारण 13 वर्षांपूर्वी उल्हासनगर 4 शासकीय प्रसूतिगृह या ठिकाणी प्रसूती झाल्यानंतर कायमस्वरूपी दोन्ही पायांनी अधू झालेल्या साधना बदाडे यांची ही कहाणी. मात्र पत्नी अधू झाल्यावर 12 वर्ष कशीतरी तिची सेवा करणाऱ्या पतीने हात टेकले आणि तिच्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याऐवजी पत्नीला आणि दोन चिमुकल्या मुलांना निराधार अवस्थेत सोडून पतीने सात-आठ महिन्यापूर्वी घर सोडले. त्याचा काही ठावठिकाणा नाही. ही बाब जेव्हा शिवसेना अपंग सहाय्य सेनेचे कल्याण लोकसभा अध्यक्ष तथा अपंग सेवा संघाचे अध्यक्ष भरत खरे यांना समजताच,त्यांनी या महिलेला आर्थिक मदत मिळावी या सकारात्मक उद्देशाने 

काल रविवारी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्सवात समाजसेवक  अनिल खंडागळे यांनी आपला मोफत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला. आणि या कार्यक्रमातून मिळालेली आर्थिक मदत तिला शिवसेना नगरसेवक-गटनेते रमेश चव्हाण यांच्या हस्ते सुपूर्द केली.तेंव्हा तिच्या अश्रूंचा बांध फुटला आणि त्यामुळे इतरांना देखील गहिवरून आले.

या कार्यक्रमात शहर प्रमुख राजेंद्र चौधरी, राष्ट्रवादी अंबरनाथ शहर अध्यक्ष सदा मामा पाटील ,मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष प्रदीप गोडसे, सेवानिवृत्त मंत्रालय अवर सचिव आय एम मोरे, पीपल्स पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रमोद टाळे, कामगार नेते रशीद शेख ,शिक्षण महर्षी प्रकाश गुरणांनी, श्री बाबा रामदेव शिक्षण संस्था चालक बाबू परमार, समाजसेवक शांताराम गवई, डॉ. तेजस्विनी गोसावी, डॉ दिलीप अहिरे, समाजसेविका कविताताई कांबळे, नूरजहाँ शेख, लता पडघन, समाजसेवक रमेश आहुजा, राजकुमार सुर्वे, दशरथ चौधरी, मीना जलवानी, बबलू मेरवडे, बाबू नायकोंडी आदी मान्यवर उपस्थित होते. 

या प्रसंगी सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी आय.एम.मोरे यानी 5 हजार रुपये आर्थिक मदत देण्याचे कबुल केले तर शिवसेना उप विभागप्रमुख दशरथ चौधरी व दामोदर मिरगुडे यांनी 50 किलो तांदूळ व इतर साहित्य देण्याचे आश्वासन दिले 

साधना बदाडे या अपंग महिलेच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी श्री बाबा रामदेव शिक्षण संस्थेने उचलली.

शहरात कोणी दानशूर व्यक्ती असतील त्यांनी या निराधार अपंग महिलेस आपल्यापरीने मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घ्यावा. असे आवाहन भरत खरे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com