शिवसेनेच्या नेत्याचे पाकीट, मोबाईल चोरीस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मार्च 2017

मुंबई - महापौरांची निवड झाल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी महापालिका मुख्यालयासमोर शक्तिप्रदर्शन केले. कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू असतानाच गर्दीचा फायदा उठवत चोराने सभागृहनेते यशवंत जाधव यांचे पाकीट आणि मोबाईल लांबविल्याची घटना घडली.

विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांची महापौरपदी निवड झाल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पालिका मुख्यालयापासून हुतात्मा चौकापर्यंत मिरवणूक काढली. यात शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यशवंत जाधव हेही त्यात होते. याच वेळी त्यांचे पाकीट आणि मोबाईल चोरीस गेला. पाकिटात 12 हजार रुपये, निवडणूक ओळखपत्र, दोन वेळा नगरसेवक झाल्याचे ओळखपत्र, आधार कार्ड व पॅन कार्ड होते, अशी माहिती जाधव यांच्या निकटवर्तीयांनी दिली. जाधव यांनी पाकीट व मोबाईल हरवल्याबाबत तक्रार केली असल्याचे उपायुक्त (परिमंडल -1) मनोजकुमार शर्मा यांनी सांगितले.

Web Title: shivsena leader wallet, mobile theft