कल्याण-मुरबाड हायवेवरील बाधित घरांसाठी शिवसेना धावली

दिनेश गोगी
बुधवार, 30 मे 2018

उल्हासनगर : उल्हासनगर मार्गे जाणारा कल्याण-मुरबाड हायवे हा शंभर फुटाचा करण्यात येत असून त्यात 200 च्या वरील पक्के घरे बाधित होत आहेत.शिवसेना या घरांना वाचवण्यासाठी धावली असून 30-40 वर्षांपासून राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या घरांच्या बदल्यात पर्यायी जागा देण्यात यावी आणि ज्यांची घरे कमी प्रमाणात तुटणार अशांना डबल माळा बांधण्याची परवानगी द्यावी अशी मागणी आज शिवसेनेने पालिका आयुक्त, सहाय्यक आयुक्तांकडे केली आहे. यावेळी आयुक्तांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे.

कल्याण-मुरबाड हायवे हा 50-60 फुटाच्या आसपास आहे.तो शंभर फुटाचा केला जाणार आहे.त्यासाठी घरे खाली करण्याच्या नोटिसा पालिकेने नागरिकांना दिल्या आहेत. मात्र सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या बाधित होणाऱ्या भिंतीला वाचवण्यासाठी दुसऱ्या बाजूंच्या नागरिकांच्या घरांचा बळी घेण्यात येत आहेत. अशा तक्रारी मिळताच शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपशहरप्रमुख राजेंद्र साहू,युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे,विभागप्रमुख सुरेश सोनवणे,उपविभाग संघटक केशव ओळेकर आदींनी आयुक्त गणेश पाटील,सहाय्यक आयुक्त नंदलाल समतानी,प्रभाग सभापती सोनू छापरू यांची भेट घेतली आणि बाधित घरांना पर्यायी जागा व कमी प्रमाणात तुटणाऱ्या घरांना डबल माळ्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली.

तेव्हा नागरिकांनी त्यांच्या नावांच्या असलेल्या मालमत्तेचे कागदपत्रे पालिकेकडे सादर करावेत.त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार.असे आश्वासन आयुक्त गणेश पाटील यांनी शिवसेनेला दिले आहे. शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी ही माहिती दिली.

Web Title: shivsena takes initiate for kalyan murbaad highways affected homes