मेगाब्लॉक त्यात सिग्नल बंदचा ताप...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

ठाणे -: मध्य रेल्वेच्या मार्गावरून रविवारचा प्रवास म्हटल्यावर हमखास मेगाब्लॉकचा फटका सहन करावा लागतो. या दरम्यान पर्यायी जलद किंवा धीम्या मार्गावरून गाड्या वळवल्या जातात; मात्र रविवारी धीम्या मार्गावर मेगाब्लॉक सुरू असताना जलद मार्गावरील सिग्नल यंत्रणेच्या नियंत्रण कक्षाला आग लागल्यामुळे एक तास रेल्वेमार्ग पूर्णपणे बंद झाला. 

रेल्वे गाड्या पारसिक बोगद्याच्या परिसरात रखडल्याने एकामागोमाग एक रेल्वे गाड्यांच्या रांगा लागल्याने प्रवाशांना चक्क रुळावर उतरून नजीकच्या स्थानकापर्यंत पोहचण्यासाठी धावपळ करावी लागली. एक तासाहून अधिक काळ हा प्रकार सुरू असल्याने ठाण्यापलीकडच्या कल्याणकडे जाणाऱ्या-येणाऱ्यांना प्रवाशांचे अक्षरश: हाल झाले. रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर काम करून संध्याकाळपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आणली; मात्र रात्री उशिरापर्यंत लोकल विलंबाने धावत होत्या. 

मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावर कल्याणकडून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या धीम्या रेल्वे रुळावर मेगाब्लॉक घेण्यात आला होता. सकाळी १०.४७ ते ४.१४ अशा पाच तासांच्या ब्लॉकचे वेळापत्रक रेल्वेने घोषित केल्याने संपूर्ण वाहतूक जलद मार्गावरून सुरू होती.