मुंबईतील सिग्नल स्मार्ट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

मुंबई - मुंबईतील वाहतुकीनुसार सिग्नल यंत्रणेचे रीशेड्युलिंग होणार आहे. सर्व सिग्नल स्वयंचलित पद्धतीचे करण्यात येणार आहेत. वाहनांच्या संख्येनुसार नवी सिग्नल यंत्रणा काम करणार असल्याने वर्दळीच्या वेळी होणाऱ्या वाहतूक कोंडीतून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. संपूर्ण प्रकल्पासाठी 150 कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. सल्लागार नियुक्तीसाठी पालिकेने 15 कोटी रुपये अंदाजित किंमत ठरवली आहे. 

मुंबईत सकाळी उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि संध्याकाळी दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या सर्वाधिक असते. शहरातील वाहनांची संख्या आणि रस्त्यांवरून धावणाऱ्या गाड्यांचा अंदाज घेऊन पालिकेने सात ते आठ वर्षांपूर्वी सिग्नलचे शेड्युलिंग केले आहे; मात्र दरम्यानच्या काळात रस्त्यावरील वाहनांची संख्या प्रचंड वाढली. त्यामुळे शहरातील सर्वच सिग्नलचे रीशेड्युलिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण शहरात स्वयंचलित सिग्नल बसवण्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. एरिया ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम आणि स्वयंचलित सिग्नल उभारण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता विनोद चिटोरे यांनी दिली. 

स्वयंचलित सिग्नल यंत्रणा जंक्‍शनवर आलेल्या वाहनांच्या संख्येनुसार काम करते. एखाद्या मार्गावर जास्त गाड्या जमा झाल्यास तिथली सिग्नलची वेळ स्वयंचलित पद्धतीने वाढवली जाते. तसेच या सिग्नलला स्वतंत्र बटनही देण्यात आले असून वाहतूक पोलिस त्याच्या आधारे वाहतूक नियंत्रण करू शकतात. सल्लगारामार्फत संपूर्ण मुंबईतील जंक्‍शनच्या वाहतुकीचा अभ्यास करून त्या दृष्टीने सिग्नलची नवी वेळ ठरवली जाण्याची शक्‍यता आहे. 

सध्याची स्थिती 
- 613 ट्रॅफिक सिग्नल 
- 257 स्वयंचलित सिग्नल 
- रस्त्यावर रोज नऊ लाखांहून अधिक वाहने असतात 
- दोन हजार किलोमीटरचे रस्ते 

Web Title: Signals Smart in Mumbai