कल्याण-डोंबिवलीत बसविणार सिग्नल 

रविंद्र खरात
बुधवार, 18 एप्रिल 2018

कल्याण : शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने 'स्मार्ट सिटी' योजनेंतर्गत शहरातील मुख्य रस्त्यांवर सिग्नल बसविण्याचा निर्णय घेतला आहे. 'मनपा हद्दीत वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे. त्यासाठी सिग्नल यंत्रणेची गरज आहे. 'स्मार्ट सिटी'अंतर्गत ही सुविधा यायला उशीर होईल. त्यापूर्वी एखादी खासगी संस्था मोफत ही यंत्रणा उभी करून देत असेल, तर त्यात पालिकेचा फायदा होईल', अशी सूचना स्थायी सभापती राहुल दामले यांनी प्रशासनाला केली. 

मनपाच्या मुख्यालयात काल (मंगळवार) स्थायी समितीची सभा झाली. त्यात वाहतूक कोंडीवर चर्चा झाली. 'श्री एंटरप्रायझेस' या खासगी संस्थेच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर कल्याण आणि डोंबिवलीतील प्रत्येकी पाच ठिकाणी सिग्नल बसविण्याच्या कामासाठी प्रशासनाला पत्र देण्यात आले आहे. या संस्थेमार्फत मोफत सिग्नल बसविले जाणार असून त्या सिग्नलच्या खांबावर जाहिरातीचा हक्क संस्थेला मिळणार आहे. 

'या संस्थेने मोफत सिग्नल यंत्रणेबाबत आणि त्यावरील जाहिरातींबाबत पत्र दिले होते. एखादी संस्था मोफत सेवा देत असेल, तर पालिकेच्या पैशांची बचत होईल. शासकीय निधी दुसऱ्या विकास कामांसाठी वापरता येईल. त्यानुसार स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली', अशी माहिती दामले यांनी दिली. 

याबाबत सर्व विभागाच्या एकत्र बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेऊन स्थायी समिती समोर प्रस्ताव ठेवू अशी माहिती शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी दिली . 

Web Title: Signals will be installed in Kalya to ensure smooth traffic