गायिकेचा विनयभंग करणारा अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

मुंबई - गायिकेचा विनयभंग करणाऱ्याला बुधवारी अंबोली पोलिसांनी अटक केली. राजेशकुमार शुक्‍ला असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

राजेशकुमार हा मूळचा बिहारचा आहे. तो गायिकेचा चाहता आहे. दोन आठवड्यांपूर्वी तो मुंबईत आला होता. त्याने गायिकेचा नंबर ऑनलाईन सर्च इंजिनवरून शोधून काढला. नंबर मिळाल्यानंतर राजेशकुमारने तिला मोबाईलवर अश्‍लील मेसेज पाठवले. त्याने गायिकेला दोन फोन आणि मेसेज केल्याचे अंबोली पोलिसांनी सांगितले. एवढ्यावरच न थांबता राजेशकुमारने गायिकेचा पत्ता शोधून काढला. तिच्या अंधेरी येथील घराजवळ राजेशकुमार गेला. घराबाहेर उभा राहून गायिकेला त्रास देऊ लागला. गायिकेला अनोळखी क्रमांकावरून फोन येऊ लागल्याने तिने या प्रकाराची माहिती अंबोली पोलिसांना कळवली. अंबोली पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान तांत्रिक माहितीच्या आधारे अंबोली पोलिसांनी राजेशकुमारला छत्रपती शिवार्जी महाराज टर्मिनस परिसरातून बुधवारी गजाआड केले. 

Web Title: singer Molestation one arrested