कुर्ल्यात चप्पलच्या गोदामाला आग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

चेंबूर - कुर्ला सिग्नल येथील वत्सलाताई नगरमधील चप्पल बनविण्याच्या गोदामाला दुपारी २ च्या सुमारास अचानक आग लागली. आगीची घटना कळताच चेंबूर अग्निशमन दल व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या १० गाड्या व पाण्याचे सहा बंबांनी घटनास्थळी दाखल होऊन दोन तासांत आग आटोक्‍यात आणली. या आगीने संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरलेले दिसत होते. कुर्ला सिग्नल ते कुर्ला स्थानक मार्गावरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती. या परिसरात एसआरएचे काम सुरू असल्याने घरे रिकामी करण्यात आली. आगीत कोणतीही जीवितहानी व वित्तहानी झालेली नाही. आग कशामुळे लागली त्याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.

Web Title: slippers godown fire

टॅग्स