युतीचा तिढा सोडवा - आठवले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

बेलापूर - मुंबईचे महापौर शिवसेना-भाजपने अडीच- अडीच वर्षे वाटून घ्यावे आणि युतीचा तिढा आपापसात सोडवावा, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला. बेलापूर येथील गोवर्धनी सेवा संस्थेच्या नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवाच्या उद्‌घाटनावेळी ते बोलत होते. 

महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढणाऱ्या शिवसेना-भाजपने प्रचारावेळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. निकालानंतर महापौर कुणाचा, याबाबत तिढा निर्माण झाला आहे. हे दोन्ही पक्ष आपलाच महापौर व्हावा, यासाठी आग्रही आहेत. बहुमतासाठी नगरसेवकांचे संख्याबळ वाढवण्याचा दोन्हीकडून प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी अपक्ष नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रकार सुरू आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना आणि भाजपने अडीच-अडीच वर्षे महापौरपद वाटून घ्यावे आणि हा तिढा सोडवावा, असा सल्ला दिला. आपल्या खात्याशी निगडित सर्व सोयी-सुविधा नवी मुंबई शहराच्या विकासासाठी देणार असल्याचेही यावेळी ते म्हणाले. 

Web Title: slove Alliance issue