मोखाड्याच्या समस्यांसाठी, सर्व समावेशक बैठक घेणार

mumbai
mumbai

मोखाडा :  मोखाड्यात आरोग्य, शिक्षण, पाणी, रोजगार, वनहक्क, पेसा कायदा, माहितीचा अधिकार, अंगणवाडी, ग्रामसभा या ठिकाणी काम करताना, ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसीलदार तसेच प्रकल्प कार्यालयाकडुन सहकार्य मिळत अडवणूक होत असल्याच्या तक्रारी येत आहे. त्यामुळे सर्व खात्यांची सर्व समावेशक बैठक घेऊन मोखाड्यातील समस्या सोडविणार असल्याची ग्वाही खासदार राजेंद्र गावीत यांनी दिली आहे. ते मोखाड्यात परिवर्तन महिला सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमास आले होते. 

यावेळी खासदार राजेंद्र गावीत यांनी परिवर्तन महिला सामाजिक संस्थेच्या बांबू प्रशिक्षण, वनहक्क, पेसा कायदा यांसह विविध ऊपक्रमाची माहीती घेतली आहे. यावेळी या भागातील समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसीलदार तसेच आदिवासी विकास प्रकल्प कार्यालया कडुन सहकार्या ऐवजी अडवणूक होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यावर ऊपाययोजना करण्यासाठी व मोखाड्याचा सर्वागीण विकास करण्यासाठी आपण सर्व खात्यांची, सामाजिक संस्थांची सर्व समावेशक बैठक घेणार असल्याची ग्वाही खासदार गावीत यांनी दिली आहे. 

परिवर्तन महिला सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमास माजी पर्यटन विकास मंत्री भाजप नेते जगन्नाथ पाटील, भाजप प्रदेश कार्यकारीनी सदस्य अॅड. देविदास पाटील, तालुका अध्यक्ष रघुवीर डिंगोरे, आदिवासी विकास आघाडीचे राजेंद्र तुमडे, भाजप शहराध्यक्ष विलास पाटील, नगरसेविका प्रतिक्षा पाघारे, परिवर्तन संस्थेच्या अध्यक्षा पाटकर, कुलकर्णी आणि परचुरे मॅडम उपस्थित होत्या.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com