मिलिंद-अंकिताचे अखेर शुभमंगल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

मुंबई - मॉडेल व अभिनेता मिलिंद सोमण हा त्याची प्रेयसी अंकिता कोनवर हिच्याबरोबर काल अलिबाग येथे विवाहबंधनात अडकला. सोहळ्याला दोघांचेही जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होती.

मुंबई - मॉडेल व अभिनेता मिलिंद सोमण हा त्याची प्रेयसी अंकिता कोनवर हिच्याबरोबर काल अलिबाग येथे विवाहबंधनात अडकला. सोहळ्याला दोघांचेही जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होती.

हा सोहळा मराठी आणि आसामी पारंपरिक पद्धतीने झाला. मिलिंदच्या मातुःश्री उषा सोमण या वेळी उपस्थित होत्या. नवपरिणीत दांपत्य लवकरच स्पेन येथे मधुचंद्रासाठी जाणार असल्याचे समजते. मिलिंद 52 वर्षांचा आहे; तर अंकिता 27 वर्षांची आहे. वयातील अंतरामुळे त्यांच्यावर खूप टीका झाली आहे.

Web Title: Soman Marries Ankita Konwar marriage