चिऊताईला हवा निवारा देशी झाडांवरच!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

विदेशी झाडे चिमण्यांच्या आरोग्याला धोकादायक ठरत आहेत. परिणामी चिमण्यांची संख्या कमी होत आहे...

मुंबई - मुंबईतील नागरिकांना २० मार्च या जागतिक चिमणी दिनानिमित्त रोपे लावण्याचे व वृक्षांची काळजी घेण्याचे आवाहन ‘नेचर फॉरेव्हर सोसायटी’ करणार आहे. 

गुलमोहर, चंपा, रेन ट्री आदींसारखी विदेशी झाडे चिमण्यांच्या आरोग्याला धोका निर्माण करतात. त्यामुळे सोसायटीच्या परिसरात चिमण्या आणि अन्य पक्ष्यांच्या अधिवासासाठी कोणती झाडे लावावीत याचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मेंदी, अडुळसा, मोगरा, कडुलिंब, पिंपळ यांसारखी आपल्या देशातील झाडे येथील पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी योग्य असतात. अनेक सोसायट्यांच्या डिझाईनमध्ये सिंगापूर, थायलॅण्ड, मलेशिया यांसारख्या देशांतील सल्लागारांची मदत घेण्यात येते. त्या वेळी येथील पक्ष्यांच्या सोईचा विचार होत नाही, असे नेचर फॉरेव्हर सोसायटीचे अध्यक्ष मोहम्मद दिलावर म्हणाले. सोसायटीच्या परिसराची शोभा वाढावी, यासाठी लावण्यात येणाऱ्या झाडांवरील विषारी फुलांकडे चिमण्या आकर्षित होतात. त्यातून आरोग्याला धोका निर्माण होतो, असे ते म्हणाले. 

मुंबई महापालिकेचेही धोरण
मुंबई महापालिकेनेही शहराच्या विकास आराखड्यात देशीबरोबरच विदेशी झाडे लावण्याचाही निर्णय घेतला आहे. पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी देशी झाडे उपयुक्त ठरतात. 

Web Title: sparrow Indigenous trees

टॅग्स