उद्दाम कर्मचाऱ्यांमुळे एसटीवर प्रवासी नाराज

उद्दाम कर्मचाऱ्यांमुळे एसटीवर प्रवासी नाराज

गेल्या दोन वर्षांत प्रवाशांच्या 6911 तक्रारी; सुटे पैसे परत न दिल्याचाही समावेश
मुंबई - राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) प्रवासी कमी होण्यास केवळ बेकायदा प्रवासी वाहतूक जबाबदार नाही. बस स्थानकांतील गैरसोई आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाबाबतच्या तक्रारी वाढल्याचीही प्रमुख कारणे आहेत. गेल्या दोन वर्षांत महामंडळाककडे प्रवाशांच्या एकूण सहा हजार 911 तक्रारी आल्या आहेत.

गेल्या दोन वर्षांत एसटी कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाविषयी दोन हजारांहून अधिक तक्रारी आल्या आहेत. एसटीच्या खडखडाटात बऱ्याच बसवाहकांच्या जिभेचा दांडपट्टा सुरू असतो. सुटे पैसे न देणाऱ्यांना, "उतरताना उरलेले पैसे मागून घ्या,' असे हक्काने बजावताना दिसतो; मात्र अनेक प्रवासी पैसे मागायचे विसरतात, अशी परिस्थिती आहे.

एसटीच्या दररोज जवळपास 18 हजार बसेस राज्याच्या कानाकोपऱ्यात धावतात. कारभाराची गाडी चार-पाच वर्षांपासून तोट्याच्या गाळात रुतून बसली आहे. गेल्या दोन वर्षांत एसटीचे तब्बल 11 कोटी प्रवासी कमी झाले आहेत. येत्या एक जानेवारीपासून महामंडळ "प्रवासी वाढवा' मोहीम हाती घेत आहे. त्यासाठी प्राथमिक सोयी-सुविधांवर लक्ष द्यावे लागणार आहे.

कर्मचाऱ्यांना अदबीने वागण्याचे धडे देण्याचीही गरज आहे. एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांशी गैरवर्तवणूक केल्याच्या 1014-15 मध्ये एक हजार 27, तर 2015-16 मध्ये एक हजार 22 तक्रारी आल्या. त्याखालोखाल सर्वांत जास्त 785 तक्रारी बसमध्ये जागा न मिळण्याबाबत आहेत.

गेल्या दोन वर्षांत महामंडळांकडे आलेल्या तक्रारींची आकडेवारी
तक्रारी 2014-15 2015-16

प्रवास भाडे 81 117
अयोग्य तिकीट देणे 73 106
सुटे पैसे परत न देणे 111 80
बस स्थानकांतील गैरसोई 96 108
अस्वच्छता 70 47
उपाहारगृहे 23 26
कर्मचाऱ्यांचे गैरवर्तन 1027 1012
बस उशिरा येणे 304 280
बसमध्ये जागा न मिळणे 399 386
बसची खराब स्थिती 87 84
वेळापत्रक 93 127
वाहतूक व्यवस्थेच्या अन्य तक्रारी 615 688
इतर 433 330
एकूण 3,520 3,391

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com