पहिल्याच वाढदिवशी शिवशाहीवर दगडफेक

ब्रह्मा चट्टे
शनिवार, 9 जून 2018

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या वातानुकूलिन शिवशाहीचा आज पहिलाच वाढदिवस आहे. राज्यभरात सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या संपामुळे पहिल्याच वाढदिनी शिवशाहीवर दगडफेक होत आहे. 

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या वातानुकूलिन शिवशाहीचा आज पहिलाच वाढदिवस आहे. राज्यभरात सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या संपामुळे पहिल्याच वाढदिनी शिवशाहीवर दगडफेक होत आहे. 

आजच्याच दिवशी 9 जून 2017 रोजी मुंबई रत्नागिरी मार्गावर पहिली शिवशाही धावली होती. याच दिवसाचे औचित्यसाधून शिवशाहीचा वाढदिवस साजरा करण्याचे नियोजनही महामंडळाकडून करण्यात येत होते. मात्र अचानकपणे एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीविरोधात अघोषीत संप पुकारल्यामुळे प्रशासनाला हा कार्यक्रम गुंडाळावा लागला आहे. दापोली - मुंबई शिवशाही बसवर  मंडणगड मार्गावरील पिसई येथे दगड फेक करण्यात आली. तर सावंतवाडी आगाराच्या औरंगाबाद सावंतवाडी या गाडीवर कणकवलीजवळ अज्ञात इसमाने पाठीमागून दगड मारल्यामुळे गाडीची काच फुटली आहे यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. शिरोली नाका येथे अज्ञात इसमाने कोल्हापूर-मुंबई शयनयान शिवशाही वर दगडफेक केली आहे.
वाढदिवशीच शिवशाहीवर दगडफेक होणे हा एक विचित्र योगायोगच म्हणावा लागेल.

राज्यात 2 हजार 'शिवशाही' बसेस एसटीच्या ताफ्यात टप्याटप्याने दाखल होत आहेत. आजपर्यंत 838 शिवशाही बसेस राज्यातील विविध 276 मार्गावर धावत आहेत. या बस चालवण्यासाठी भाड्याने घेतल्या आहेत. गाडीचे भाडे, डिझेल किंमत व वाहकाचा पगार महामंडळाला द्यावा लागतो. शिवशाही बसेस सरासरी किमान रू 35 प्रती किमी दराने चालल्या तर परवडतात.

सध्या शिवशाहीचे सरासरी उत्पन्न रू 42 प्रति किमी एवढे आहे. महामंडळाचे सध्याचे सरासरी उत्पन्न रू 30 प्रतिकिमी आहे. ते किमान रू 35 प्रतिकिमी असणे आवश्यक आहे. शिवशाहीचे सरासरी भारमान 65 टक्के आहे जे सर्वाधिक आहे. महामंडळाचे दैनंदिन उत्पन्न 19 कोटी आहे. त्यापैकी शिवशाही बसेस सध्या दिड कोटी उत्पन्न मिळवून देते. महामंडळाचा आतापर्यंत 2 हजार 300 कोटी संचित तोटा आहे. हा तोटा कमी करण्यासाठी महामंडळाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून महामंडळाने वातानुकुलिन शिवशाही बसची सुरवात केली.

Web Title: stone pelting on shivshahi on its first birthday