न्यायालयातील लिपिक ते जजसाहेब; विश्वनाथ शेट्टी यांचा प्रेरणादायी प्रवास

vishwanath shetty
vishwanath shetty

विक्रोळी :  सर्वसामान्य नागरिकांना न्याय देता यावा, त्यांच्यात न्यायालयाप्रती विश्वास निर्माण व्हावा आणि आपण तो कधीतरी देऊ असे स्वप्न पाहिलेल्या 37 वर्षीय विश्वनाथ शेट्टी यांना आता प्रत्यक्षात न्यायदान करता येणार आहे. विक्रोळी दंडाधिकारी न्यायालयात लिपिक म्हणून काम करणाऱ्या शेट्टी यांनी जिद्दीने न्यायाधीश पदाची परीक्षा उत्तीर्ण केली. आता त्यांची दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी पदावर निवड झाली आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

सोलापूर वरून मुंबईत आलेल्या शेट्टी यांचे वडील सोलापूर जिल्हा न्यायालयातील अधिक्षक म्हणून कामाला होते. काकाही न्यायालयात कामाला होते. घरी नेहमीच जजसाहेबांनी आज सर्वसामान्याना न्याय दिला, न्यायदान असावे तर असे, अशी वाक्ये त्यांना ऐकायला मिळत. काका आणि वडिलांची चर्चा ऐकून शेट्टी यांनाही काका वडिलांच्या चर्चेमधला साहेब बनावे असे वाटे. त्यांनी राज्यशास्त्र विषयातून पदवीचे शिक्षण शिवाजी विद्यापीठ येथे पुर्ण केले. 2008 साली मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालय मुंबई  येथे लिपिक म्हणून निवड झाली. 2009 साली सिद्धार्थ महाविद्यालयात एलएलबी ला प्रवेश घेतला. सकाळी 7 ते सकाळी 10 महाविद्यालयाचा अभ्यास आणि नंतर कार्यालयीन काम असे करत त्यांनी विधी अभ्यासक्रम उत्तीर्ण केला. सन 2016 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत प्रयत्न केला पण अपयशी ठरला. पण मनाशी ठरवलं, पुन्हा एकदा अभ्यास सुरू केला. सन 2017 ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेला ते बसले आणि दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी पदावर निवड झाली. 

अनेक अडचणीचा सामना
विक्रोळी न्यायालयात कामाला आणि बदलापूरला राहायला असल्यामुळे अभ्यासाला  वेळ मिळायचा नाही वेळेचा नियोजन करताना त्रास होत होता. सकाळी 5 ते 7 अभ्यास नंतर कार्यालयीन काम यातून जेवढा वेळ काढता येईल तेवढा अभ्यास करायचो. सकाळी ट्रेनमधून जाताना मोबाईलच्या सहाय्याने अभ्यास करायचो. खंत एवढीच वाटते मी कुटूंबाला वेळ देता नाही आला. मुलीच्या लहानपणी मला तिच्याजवळ जास्त राहता आलं नाही. सुट्टीच्या वेळी तर सकाळी 7 ते संध्याकाळी 7 असा 
 अभ्यास करायचो. पत्नी सविता हिने कुटुंबाची जवाबदारी पेलत मला अभ्यासासाठी वेळ दिला. बदलापूर येथील शारदा अभ्यासिकेचा खूप उपयोग झाला. तिथे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे पुस्तक विनामुल्य उपलब्ध आहेत त्यामुळे खर्च थोडा कमी झाला. जिल्हा न्यायधीश एम जे मिरजा यांचेही मार्गदर्शन लाभले, असे शेट्टी म्हणाले.  पुढे ही शिक्षण घेत राहणार. एल एल एम परीक्षेची करणार तयारी करणार आहे. सायबर लॉ बद्दल माहिती घेणार आहे.

इंटरनेट आणि युट्युबचा झाला उपयोग 
नवीन कायदे आणि त्याची माहिती इंटरनेटवर सहजपणे उपलब्ध होती. तसेच युट्यूब असणाऱ्या व्हिडिओचा ही खूप उपयोग झाला. मुलाखातीची तयारी कशी करायची याची माहिती मिळाली. प्रवास करताना युट्युबवरचे व्हिडिओ लावून अभ्यास केला. 

अर्धवट शिक्षण सोडू नका
कोणत्याही स्पर्धा परीक्षेत पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यावर खचून जावू नका. प्रयत्न करत रहावा कारण पहिल्यावेळी तुमच्याकडे काही अनुभव नव्हता पण दुसर्यावेळी तो असणार याचा विचार करा असा संदेश त्यांनी तरुणांना दिला.

चांगल्या प्रकारे न्याय देण्याचे काम
न्यायालयात काम असल्यामुळे मी न्यायाधीशाचे काम जवळून बघितले आहे. त्याचा उपयोग ही मला परीक्षेवेळी झाला. कामाची पध्द्त माहीत असल्यामुळे न्यायाधीश म्हणून काम स्वीकारल्यानंतर जास्त अडचणी येणार नाहीत. 

विश्वनाथ यांचे यश हे प्रेरणादायी वाटत आहे. त्यांनी एवढ्या अडचणीत हे यश प्राप्त केले आहे. आमच्यासाठी कौतुकास्पद बाब आहे.
-  ईश्वर निखाडे, सहकारी

खूप आनंद होता आमचे सहकारी न्यायाधीश झाला आहे. जेव्हा त्यांना कळालं की ते परीक्षा उत्तीर्ण झाले. तेव्हा ते  रडू लागले. मेहनतीचे अश्रू होते. त्यांचे सहकारी असल्याचा आम्हाला अभिमान आहे. 
- वीणा जांभेकर, सहकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com