विद्यार्थ्यांची 44 प्रकारची माहिती भरण्याचे फर्मान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

मुंबई - विद्यार्थ्यांची 44 प्रकारची माहिती शिक्षकांनी अवघ्या दोन दिवसांत भरून देण्याचे फर्मान शिक्षण विभागाने मंगळवारी काढले. त्याचे पडसाद शिक्षण क्षेत्रात उमटले आहेत. या फर्मानामुळे परीक्षा व निकालांच्या काळात शिक्षकांवर मोठा ताण पडण्याची चिन्हे आहेत.

मुंबई - विद्यार्थ्यांची 44 प्रकारची माहिती शिक्षकांनी अवघ्या दोन दिवसांत भरून देण्याचे फर्मान शिक्षण विभागाने मंगळवारी काढले. त्याचे पडसाद शिक्षण क्षेत्रात उमटले आहेत. या फर्मानामुळे परीक्षा व निकालांच्या काळात शिक्षकांवर मोठा ताण पडण्याची चिन्हे आहेत.

पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक, नाव, आई-वडिलांचे नाव, जन्म तारीख, लिंग, सामाजिक वर्ग, धर्म, मातृभाषा, प्रवेश दिनांक, प्रवेश क्रमांक, वंचित घटक, आरटीई प्रवेश, माध्यम, अपंगत्व, मोफत गणवेश, पुस्तके, बॅंकेचे खाते क्रमांक आदी 44 प्रकारची माहिती उद्यापर्यंत (ता. 18) भरायची आहे.

शिक्षक परिषदेच्या अनिल बोरनारे यांनी या कामाला विरोध दर्शवला आहे. मुळात शिक्षकांनी सरलमध्ये ही माहिती भरली असून, त्यातूनच शिक्षण विभागाने हा तपशील घेणे आवश्‍यक आहे; परंतु शालेय शिक्षण विभाग शिक्षकांना या कामात गुंतवून निव्वळ मनस्ताप देण्याचे काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या कामामुळे परीक्षा निकालांवर परिणाम होण्याची भीती असून, कमी केलेल्या आयसीटी शिक्षकांना यासाठी पुन्हा कामावर घ्यावे, अशीही मागणी केली जात आहे. एकामागोमाग एक येणाऱ्या या अशैक्षणिक कामांमुळे आम्हाला शिकवण्याचे काम करता येणार नाही, अशीही प्रतिक्रिया शिक्षक व्यक्त करीत आहेत. "राइट टू एज्युकेशन' कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षकांना कोणत्याही प्रकारचे अशैक्षणिक काम देता येत नाही.

तरीदेखील शालेय शिक्षण विभागाकडून असे आदेश काढून कायदा पायदळी तुडवला जात असल्याचा आरोपही शिक्षणतज्ज्ञ करीत आहेत.

Web Title: student information mension teacher