विद्यार्थिनीने खेचले विद्यापीठाला न्यायालयात

विद्यार्थिनीने खेचले विद्यापीठाला न्यायालयात

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. अभियांत्रिकी शाखेच्या एका विद्यार्थिनीचा सत्र एक आणि दोनच्या केटीचा निकाल तब्बल दीड वर्षे रखडविल्याने अखेर तिने विद्यापीठाला उच्च न्यायालयात खेचले आहे. त्याबाबतच्या याचिकेवर सोमवारी (ता. १५) सुनावणी होणार आहे. 

जुहूतील डी. जे. संघवी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी नेहा चांडक हिने २०१७ मध्ये सत्र एक आणि दोनची केटीची परीक्षा दिली. विद्यापीठाने मे महिन्यात घेतलेल्या परीक्षेचा निकाल ऑगस्टमध्ये जाहीर केला. मात्र, आजतागायत विद्यापीठाने निकाल जाहीर केला नसल्याचा आरोप चांडक हिने केला आहे. निकालाबाबत तिने परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांची वारंवार भेट घेतली; परंतु थातूरमातूर उत्तरे देत तिची तक्रार ऐकण्यास त्यांनी नकार दिला. केटीचा निकाल प्रलंबित असल्याने तिला सत्र सातच्या परीक्षेला बसू देण्यास महाविद्यालयाने नकार दिला आहे. सत्र सातला प्रवेश न मिळाल्यास तिची चार वर्षे वाया जाणार आहेत. त्यामुळे तिने अखेर उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्याबाबत अधिक बोलणे उचित नसल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. 

इतर विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले, पण माझा निकाल न आल्याने मी विद्यापीठाकडे वारंवार विचारणा केली; परंतु विद्यापीठाने कोणतीही मदत केली नाही. माझे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने त्याबाबत मी न्यायालयात धाव घेतली. 
- नेहा चांडक, याचिकाकर्ती विद्यार्थिनी.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com