आत्महत्येचा प्रयत्न करणारा अटकेत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मार्च 2017

मुंबई - विधान भवनासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला मरिन ड्राईव्ह पोलिसांनी अटक केली. अनिल सहाने असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.

मुंबई - विधान भवनासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला मरिन ड्राईव्ह पोलिसांनी अटक केली. अनिल सहाने असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.

राज्याचे अर्थसंकल्पी अधिवेश सुरू आहे. यादरम्यान आपल्या मागण्यांकरता अनिल नाशिकहून मुंबईत आला होता. रविवारी (ता. 5) तो विधान भवनाच्या वाल्मीकी गेटजवळ पोचला. तेथे त्याने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार गस्तीवरील पोलिसांनी पाहिला. त्यांनी तत्काळ त्याला सेंट जॉर्जेस रुग्णालयात दाखल केले. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अनिलच्या विरोधात मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र उपचार सुरू असल्याने पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती. शुक्रवारी (ता. 10) त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले. पोलिसांनी तत्काळ त्याला अटक करून शनिवारी (ता. 11) न्यायालयात हजर केले होते.

Web Title: suicide trying arrested