निलंबनाच्या विरोधात विरोधक राज्यपालांकडे

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 मार्च 2017

मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांची तातडीने कर्जमाफी करावी आणि कर्जमाफीची मागणी रेटून धरणाऱ्या कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 19 आमदारांचे निलंबन तातडीने मागे घ्यावे, या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने आज सायंकाळी राज्यपालांची भेट घेतली.

विधिमंडळातील दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानसभेतील गटनेते जयंत पाटील, कॉंग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे आदी नेत्यांसह विरोधी पक्षाच्या सुमारे 60 आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकारच्या राजकीय दडपशाहीची माहिती दिली.

विखे पाटील यांनी विधानसभेत आज घडलेल्या नाटकीय घटनाक्रमाची माहिती राज्यपालांना दिली. जयंत पाटील यांनी सरकार सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला.