डहाणूच्या किनाऱ्यावर संशयास्पद वस्तू

अच्युत पाटील
बुधवार, 25 एप्रिल 2018

बोर्डी : पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या नरगपालिका क्षेत्रातील किनाऱ्यावरील आगर गावाच्या लँडिंगपॉईंट येथे संशयास्पद वस्तू पहाटे साडेपाचच्या सुमारास आढळली. ही सीलबंद वस्तू अल्युमिनीएम डब्यासारखी असल्याची माहिती ड्युटीवर उपस्थित सागरी सुरक्षारक्षकाने स्थानिक पोलिस आणि तटरक्षक दलाला दिली.

त्यानंतर पथकासह घटनास्थळी दाखल होवून पाहणी केली. दरम्यान ठाणे येथील बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

रात्रीच्या भरती वेळी ही वस्तू किनाऱ्यावर लागल्याचे बोलले जात आहे. दोन वर्षापूर्वी एका लाईफ बोटीतून चार परदेशी नागरिक याच ठिकाणी समुद्र मार्गाने आले होते. स्थानिक पोलिसांनी वरवरची चौकशी करून त्यांना सोडून दिले होते. याची आठवण येथील एका ग्रामस्थाने करून दिली.

Web Title: Suspicious thing found near Dahanu