स्वाधीन क्षत्रिय यांचा आज शपथविधी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 मार्च 2017

मुंबई - माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय हे बुधवारी (ता. 1) राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त म्हणून शपथ घेणार आहेत.

हा शपथविधी सोहळा मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात सकाळी होणार आहे. राज्याचे लोकायुक्त हे क्षत्रिय यांना राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त या पदाची शपथ देतील.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 ची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी राज्यात मुंबई शहर व उपनगर, जिल्ह्याकरिता "राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त' तसेच इतर प्रत्येक महसुली विभागासाठी प्रत्येकी एक या प्रमाणे एकूण सहा "राज्य सेवा हक्क आयुक्त' नेमण्याची तरतूद आहे. त्यानुसार क्षत्रिय हे राज्याचे पहिले मुख्य सेवा हक्क आयुक्त म्हणून शपथ घेतील.

Web Title: swadhin kshatriya of today sworn in