सरबत पिताय? सावधान! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

मुंबई - उन्हामुळे होणाऱ्या काहिलीवर उतारा म्हणून रस्त्यावरील सरबत विक्रेते किंवा हॉटेलांमध्ये मिळणारी सरबते पिणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. मुंबई पालिकेच्या आरोग्य खात्याने महिनाभरात काही सरबत विक्रेत्यांकडील तसेच हॉटेलांतील बर्फाच्या नमुन्यांच्या केलेल्या तपासणीत 90 टक्‍क्‍यांहून नमुने दूषित असल्याचे आढळले. दूषित बर्फ असलेली सरबते प्यायल्याने शहरात काविळीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचेही निदर्शनास येत आहे. 

बर्फ बनवण्यासाठी वापरले जाणारे पाणी, या पाण्याची तसेच तयार झालेल्या बर्फाची हाताळणी, बर्फ ठेवण्यासाठी वापरली जाणारी अस्वच्छ जागा आदी कारणांमुळे बर्फ दूषित होतो. हे बर्फ असलेली सरबते प्यायल्याने काविळीचे रुग्ण वाढत आहेत. विशेषतः झोपडपट्ट्यांमध्ये या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे पालिकेच्या आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नाल्यांमधून जाणाऱ्या जलवाहिन्यांतील पाण्यात दूषित पाणी मिसळल्यानेही काविळीचे रुग्ण वाढत असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. 

तपासणी झालेले बर्फाचे नमुने ः 400 
दूषित नमुने ः 352 

क्षयाचे रुग्णही वाढले 
शहरात क्षयाचे रुग्णही वाढत आहेत. आरोग्य खात्याने केलेल्या सर्वेक्षणानुसार, डिसेंबर 2017 पर्यंत मुंबईत 21 हजार 706 क्षयाचे रुग्ण आढळले. चार महिन्यांत त्यात शंभर रुग्णांची भर पडली आहे. 

मार्चमध्ये शहरातील 410 बर्फाचे नमुने घेतले होते. त्यापैकी 400 नमुने दूषित असल्याचे आढळून आले आहेत. दूषित बर्फ उघड्यावर आढळल्यास तो नष्ट केला जातो. व्यावसायिक आस्थापनामध्ये आढळल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येतो. ही कारवाई निरंतर सुरू असते. 
डॉ. पद्मजा केसकर, आरोग्य अधिकारी, महापालिका 

Web Title: Syrup Be careful