तानाजी सावंत ठरले सर्वांत श्रीमंत आमदार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

कॉंग्रेसचे अमर राजूरकर शेवटच्या क्रमांकावर
मुंबई - विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या सहा आमदारांपैकी शिवसेनेचे तानाजी सावंत सर्वांत श्रीमंत आमदार ठरले आहेत. सावंत यांच्याकडे 115 कोटी 45 लाख रुपयांची संपत्ती आहे. तर कॉंग्रेस आमदार अमर राजूरकर यांच्याकडे 15 कोटी रुपयांची मालमत्ता असून, ते विजयी उमेदवारांमध्ये संपत्तीच्या बाबतीत शेवटच्या क्रमांकावर आहेत.

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत एकूण 28 उमेदवार रिंगणात होते. निवडणूक अर्जासोबत उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचा अभ्यास "असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफाएर्म आणि महाराष्ट्र इलेक्‍शन वॉच' या दोन संस्थांनी केला आहे. या अभ्यासात विधान परिषदेची निवडणूक लढविलेल्या 28 पैकी 20 उमेदवार हे कोट्यधीश असल्याचे आढळून आले. कोट्यधीश उमेदवारांमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या पक्षांच्या उमेदवारांचा समावेश होता.
यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे तानाजी सावंत यांच्या नावे चार वाहने आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुण्यातील आमदार अनिल भोसले यांची 74 कोटी 36 लाख रुपयांची मालमत्ता असून, त्यांच्याकडेही चार वाहने आहेत. भोसले यांच्यावर सात कोटी, तर भाजपचे जळगावचे आमदार चंदूलाल पटेल यांच्यावर सहा कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे संस्थांनी म्हटले आहे. संस्थांच्या अहवालानुसार 28 पैकी सात उमेदवारांनी आपल्यावर असलेल्या गुन्ह्यांची माहिती निवडणूक आयोगाला दिली होती.

आमदार सावंत यांच्यावर भैरवनाथ शुगर वर्क (जि. उस्मानाबाद) या साखर कारखान्यातील कामगारांचा भविष्या निधी आणि प्रशासकीय शुल्क न भरल्याचा गुन्हा आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचित आमदार डॉ. परिणय फुके यांच्या विरोधातील फसवणुकीचा खटला न्यायालयात प्रलंबित आहे. कॉंग्रेस आमदार अमर राजूरकर, मोहनराव कदम आणि भाजपचे चंदूलाल पटेल यांच्यावर कोणताही गुन्हा नाही, असे म्हटले आहे.

मुंबई

मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व...

05.48 AM

मुंबई - "लिव्ह इन रिलेशनशिप' साथीदाराने दूरध्वनी न घेतल्याने तिच्या पाच...

05.33 AM

मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी मोठ्या प्रमाणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा...

05.27 AM