तनिष्कांचा मातृदिन अनाथालयात  

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

जुईनगर - जागतिक मातृ दिनानिमित्त नेरूळ-जुईनगर तनिष्का गटातर्फे सानपाडा येथील वात्सल्य सेवा ट्रस्टच्या अनाथालयात शनिवारी (ता. १३) मातृदिन साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे त्यात तनिष्का अभियान स्त्री व्यासपीठाच्या लोगोचे चित्र असलेला केक अनाथ मुलांसोबत कापून हा मातृदिन साजरा करण्यात आला. यावेळी येथील मुलांनी कार्यक्रम सदर केले. तनिष्का सदस्यांनी या मुलांसोबत गप्पा मारल्या. त्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. मुलांच्या आवडीचा आंबा, डाळिंब आणि चिकू ही फळे व खाऊचे वाटप करून मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

आमच्या मुलांसोबत आम्ही मातृदिन साजरा करतोच; परंतु आज या मुलांसोबत मातृदिन साजरा करताना खूपच आनंद झाला, असे मत तनिष्का सदस्यांनी व्यक्त केले. 

तनिष्का गट मार्गदर्शक गौरी सावंत, समन्वयक संध्या कोकाटे, गटप्रमुख विद्या भांडेकर, हौसाबाई जगताप, स्मिता गायकवाड, अनिता सणस, कीर्ती सोसा, स्वप्ना सरोदे, सिथिया घोडके, पूजा वेलणकर, श्‍वेता मोरे, रेश्‍मा पांचाळ, रेखा भोसले व माधवी रिस्वडकर आदी तनिष्का सदस्या यावेळी उपस्थित होत्या.

Web Title: Tanishq's Mother's Day Orphanage

टॅग्स