शिक्षकांना दांड्या भोवणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

उल्हासनगर - निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता, शिस्त असावी यासाठी पालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी विशेष प्रशिक्षण घेतले होते. त्यात शिक्षक व इतर विभागाचे कर्मचारी अशा २२५ जणांनी दांड्या मारल्या. शिक्षकांना त्या भोवण्याची शक्‍यता आहे. निंबाळकर यांनी खरमरीत नोटीस बजावताच या मंडळींनी गुरुवारी (ता.९) खुलासा करण्यासाठी पालिकेत धाव घेतली आहे.

निंबाळकर यांनी दांडीबहाद्दर शिक्षकांची चांगलीच हजेरी घेतली. गैरहजेरीचे कारण म्हणून देण्यात आलेल्या खुलाशात तफावत किंबहुना फसवेगिरी आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई किंवा फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. यामुळे दांडी बहाद्दरांची पाचावर धरण बसली आहे.

२१ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी  कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, भिवंडी-निजामपूर पालिका, अंबरनाथ नगर परिषद, परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांचे शिक्षक, इतर सरकारी विभागातील कर्मचारी अशा एक हजार ५०० कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.  त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी रविवारी (ता.५) टाऊन हॉल येथे सत्र घेण्यात आले. या सत्राला २२५ हून अधिक कर्मचारी गैरहजर होते. ही बाब निंबाळकर यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे गैरहजेरीबाबत सर्व दांडीबहाद्दरांना नोटिसा बजावल्या. त्यांना गुरुवारी लेखी खुलाशासह भेटण्याचे आदेश निंबाळकर यांनी दिले होते.

प्रशिक्षणाला उपस्थित राहण्याची नोटीस उशिराने मिळाली, आजारी आहे, रजेवर आहे आदी खुलासे दांडीबहाद्दरांनी दिले असून त्याची शहानिशा केली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

मुंबई

भाईंदर : मीरा भाईंदर निवडणुकीची मतमोजणी आज (सोमवारी) सकाळी सुरू होताच भाजपने आघाडी घेतल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे भाजपा...

01.57 PM

मुंबादेवी : आज रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत दक्षिण मुंबईची शान म्हणून ओळखला जाणारा "देव माझा उमरखाडीचा राजा" गणरायाची मिरवणूक...

09.54 AM

मुंबई - आमचा नंदीबैल दररोज शेकडो आबालवृद्धांना आशीर्वाद देतो... आज आमच्या कुटुंबाला त्याच्या आशीर्वादाची आवश्‍यकता आहे......

05.06 AM