ठाण्यातील ३२ फुटी ओवळ्याचा राजा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या आकाराचे ४ फूट ३ इंच उंचीचे व १२ फुटी घेर असलेले शिवलिंग जसे ठाण्यातील प्राचीन कौपिनेश्‍वर मंदिरात आहे; तसेच सर्वांत मोठी तब्बल ३२ फुटी उंच हनुमान मूर्ती ठाण्यातील घोडबंदर रोडवरील निसर्गरम्य ओवळा गावात आहे. ही मूर्ती पाहण्यासाठी भाविकांची रीघ लागते. तर, हनुमान जयंतीला येथे मोठा सोहळा होतो. ओवळा गावातील स्थानिक समाजसेवक दिलीप ओवळेकर यांनी ही हनुमानाची मूर्ती उभारली आहे. आदिवासीबहुल असलेल्या ओवळा गावात पूर्वीच्या काळी वीज नव्हती. तेथे ५० वर्षे जुने हनुमान मंदिर असून, येथेच ओवळेकर यांचे बालपण गेले.

महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या आकाराचे ४ फूट ३ इंच उंचीचे व १२ फुटी घेर असलेले शिवलिंग जसे ठाण्यातील प्राचीन कौपिनेश्‍वर मंदिरात आहे; तसेच सर्वांत मोठी तब्बल ३२ फुटी उंच हनुमान मूर्ती ठाण्यातील घोडबंदर रोडवरील निसर्गरम्य ओवळा गावात आहे. ही मूर्ती पाहण्यासाठी भाविकांची रीघ लागते. तर, हनुमान जयंतीला येथे मोठा सोहळा होतो. ओवळा गावातील स्थानिक समाजसेवक दिलीप ओवळेकर यांनी ही हनुमानाची मूर्ती उभारली आहे. आदिवासीबहुल असलेल्या ओवळा गावात पूर्वीच्या काळी वीज नव्हती. तेथे ५० वर्षे जुने हनुमान मंदिर असून, येथेच ओवळेकर यांचे बालपण गेले. याच हनुमान मंदिरात ते व्यायाम करीत असल्याने त्यांची हनुमानावर भक्ती जडली. २२ वर्षांपूर्वी ते दिल्लीला पर्यटनासाठी गेले असता, तेथील हनुमानाची भव्य मूर्ती पाहून त्यांचे डोळे दिपले. त्यांनी अशीच मूर्ती ठाण्यात उभारायचे ठरवले. त्यानुसार, मार्च २०१२ मध्ये उत्तर प्रदेशातून ५ हजार किलो वजनांची ३२ फुटी हनुमान मूर्ती आणून ती ओवळा गावात स्थापन केली. येथे ओवळ्याचा राजा नावाचे मंदिर उभारले असल्याने भाविकांसाठी हे मोठे आकर्षण आहे. एका आदिवासी चिमुकलीने हनुमानाच्या पायावर डोके ठेवले असता, उन्हाने चटके बसल्याची तक्रार केल्याने सध्या या मूर्तीला भव्य असे छत्र उभारण्यात आले आहे.