ठाण्यात दीड कोटीच्या जुन्या नोटा जप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

ठाणे - चलनातून रद्द झालेल्या एक हजार आणि पाचशेच्या दीड कोटी रुपयांच्या जुन्या नोटा ठाण्यात जप्त करण्यात आल्या आहेत. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने याप्रकरणी एकाला अटक केली आहे.
उमेश शिरसेकर (वय 28) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. विटावा परिसरात राहणारा उमेश शिरसेकर याला ठाण्यातील दोन व्यक्तींनी 50 टक्के कमिशनवर नोटा बदलून देण्याचे आश्‍वासन दिले होते. काल (ता.30) रात्री तो नौपाड्यातील हरिनिवास सर्कल येथे आला. जुन्या नोटा बदलण्यासाठी एक व्यक्ती येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून शिरसेकर याला पकडले.

शिरसेकर याच्याकडे 49 लाखांच्या एक हजारच्या चार हजार 900 नोटा; तर 89 लाखांच्या 500 रुपयांच्या 17 हजार 900 नोटा असलेली बॅग सापडली. ही रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. त्याने आणलेली मोटारही पोलिसांनी जप्त केली. नोटा बदलून देण्याचे आश्‍वासन देणाऱ्या अन्य दोन आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

टॅग्स