दुप्पट रकमेचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना 4 कोटींचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

ठाणे - फिनिक्‍स रेलकॉन कंपनीने आकर्षक विमा व दुप्पट रकमेचे आमिष दाखवून ठाणे जिल्ह्यातील शेकडो गुंतवणूकदारांना अंदाजे चार कोटी 45 लाख 78 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी कंपनीचे चेअरमन चंद्रकांत इंगवले याच्यासह साथीदारांवर नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नौपाडा येथील बी केबिन परिसरात फिनिक्‍स रेलकॉन प्रा. लि. कंपनीने कार्यालय उघडले होते. कंपनीचे चेअरमन चंद्रकांत इंगवले व इतर कर्मचाऱ्यांनी नागरिकांना कंपनीचे सभासद होण्यास सांगितले. 5 ते 7 वर्षांच्या कालावधीमध्ये मुदतठेव दुप्पट व आकर्षक विमा देण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यातून कंपनीने सुमारे चार कोटी 45 लाख 78 हजार रुपये सभासदांकडून घेतले. 2008 पासून सभासदांनी येथे गुंतवणूक केली असून, आतापर्यंत त्यांना कोणतीही रक्कम मिळाली नाही. त्यातच कंपनीचे कार्यालय बंद करून इंगवले व त्याच्या कर्मचाऱ्यांनी पळ काढला. त्या वेळी सभासदांना आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले. अखेर भिवंडी येथील एका सभासदाने नौपाडा पोलिस ठाण्यात मंगळवारी तक्रार नोंदविली आहे.