परप्रांतीय मासे विक्रेत्यांना ठाण्यात "मनसे'ची मारहाण

परप्रांतीय मासे विक्रेत्यांना ठाण्यात "मनसे'ची मारहाण
ठाणे - रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांना हुसकावून लावल्यानंतर "मनसे'च्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. 24) परप्रांतीय मासे विक्रेत्यांना लक्ष्य केले. त्यांना मारहाण करून त्यांचे मासे रस्त्यावर फेकले. कोलबाड भागात रस्त्यावर टोपल्या घेऊन बसलेल्या परप्रांतीय मासे विक्रेत्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावण्यास सुरवात केली. काही कार्यकर्त्यांनी विक्रेत्यांना मारहाण केली. त्यांच्या टोपल्यांमधील मासे रस्त्यावर फेकले. मनसेच्या या आंदोलनामुळे परप्रांतीय मासे विक्रेत्यांनी त्या भागातून पळ काढला. डोक्‍यावर टोपल्या घेऊन फिरणाऱ्या मासे विक्रेत्यांनाही कार्यकर्त्यांनी पिटाळून लावले. टोपल्यांतून मासे विक्री करणाऱ्या परप्रांतीयांमुळे स्थानिक कोळी आणि आगरी मासे विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याने हे आंदोलन करण्यात आल्याचा दावा मनसेने केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com