कासकरच्या कोठडीत चार दिवसांची वाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

ठाणे - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्‍बाल कासकर, कासकरचे साथीदार मुमताज शेख व इसरार सैय्यद यांच्या पोलिस कोठडीमध्ये चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

ठाणे - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्‍बाल कासकर, कासकरचे साथीदार मुमताज शेख व इसरार सैय्यद यांच्या पोलिस कोठडीमध्ये चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

ठाण्यातील खंडणी प्रकरणात इक्‍बालला मदत करणाऱ्या आणखी चार जणांची नावे समोर येत आहेत. ते मुंबई व बिहारमधील रहिवासी आहेत. या चारही जणांची माहिती मिळविण्यासाठी इक्‍बालची पोलिस कोठडी वाढवून मिळावी, असे पोलिसांकडून न्यायालयात सांगण्यात आले. त्यानंतर न्यायाधीश आर. टी. पिंगळे यांनी चार दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सुनावली. कासकर याला पोलिसांबाबत काही तक्रार आहे का? असा प्रश्न न्यायाधीश आर. टी. पिंगळे यांनी विचारला. त्यावर पोलिसांबाबत कुठलीही तक्रार नसल्याचे उत्तर कासकरने दिले.