कासकरला पैसे पुरवणाऱ्या मटका किंगला अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

ठाणे - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्‍बाल कासकर याला आर्थिक साहाय्य करणाऱ्यांच्या मुसक्‍या आवळण्यास पोलिसांनी सुरवात केली असून, बोरिवलीतील मटका किंग पंकज गांगरला अटक केली आहे. गुरुवारी दुपारी ठाणे न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला 5 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

पंकजकडून मिळणाऱ्या पैशांच्या बळावर इक्‍बालने शस्त्रखरेदी केली असल्याची माहिती समोर आली आहे. शम्मी मुरबा, गुड्डू आणि सादर सहबाग हे आरोपी फरारी असून, त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणामध्ये पाकिस्तानमध्ये तळ ठोकून असलेल्या छोटा शकीलचे नाव समोर आले आहे. तसेच, दाऊदचा सहभाग असल्याची शक्‍यता लक्षात घेऊन पोलिस तपास करीत आहेत.

पाकिस्तानमध्ये तळ ठोकून असलेला छोटा शकील इक्‍बालच्या मदतीने मुंबई आणि ठाण्यातील खंडणीचे रॅकेट चालवत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात छोटा शकील यास मुख्य आरोपी केले आहे. इक्‍बाल कासकरला मदत करणाऱ्या अन्य साथीदारांची धरपकड सुरू करण्यात आली आहे.

Web Title: thane mumbai news matka king arrested