अमरनाथ यात्रेकरूंना वाचवणाऱ्या सलीमचा मुंब्र्यात सत्कार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

ठाणे - अमरनाथ यात्रेकरूंचे प्राण वाचवणारा बसचालक सलीम शेख याचा देशातील पहिला सत्कार मुंब्र्यात करण्यात आला. या वेळी सलीमला एक लाखाचा धनादेश देऊन गौरवण्यात आले.

या वेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘जोपर्यंत सलीमसारखे शहजादे या देशात आहेत, तोपर्यंत हा देश तुटणार नाही’, या शब्दात त्याचे कौतुक केले. सलीमने स्वतःचा जीव धोक्‍यात घालून अतिरेक्‍यांच्या गोळीबारातून ५० भाविकांचे प्राण वाचवण्याची मोलाची कामगिरी केल्याने देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे; मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलीमची साधी दखलही घेतली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादीचे कळवा-मुंब्रा विधानसभा अध्यक्ष शमीम खान आणि नगरसेवक अशरफ पठाण यांनी सलीमच्या सत्काराचा कार्यक्रम घेतला. ‘एखाद वेळेस अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला कुणी उपचारासाठी रुग्णालयात नेत नाही; मात्र अमरनाथ यात्रेदरम्यान सलीमने अतिरेक्‍यांचा गोळीबार सुरू असतानाही ५० यात्रेकरूंचे प्राण वाचविले, ही कौतुकास्पद बाब पंतप्रधानांच्या नजरेतून कशी काय सुटू शकते? सलीमचे फोनवरून कौतुक करावे, असेही मोदी यांना वाटू नये?’ या शब्दात आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली. या वेळी प्रख्यात गायिका, अभिनेत्री सलमा आगा, सिनेअभिनेते अली खान, प्रसिद्ध गायक मोहन राठोड आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.